देशातील बुलेट बाईकस्वारांच्या वोल्फेपॅक इंडिया क्लबचे स्नेहसंमेलन गुहागरमध्ये

रत्नागिरी ः ८ वर्षापूर्वी देशातील बुलेटस्वारांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या वोल्फेपॅक इंडिया मोटरसायकल क्लबचे यावर्षीचे स्नेहसंमेलन तीन दिवस गुहागरमधील शांताई रिसॉर्टमध्ये होणार आहे. १९९१ मध्ये तेलंगणामध्ये वोल्फेपॅक इंडिया या बुलेट मोटरसायकल क्लबची स्थापना करण्यात आली. त्यानंतर हैद्राबाद, मुंबई, पुणे, बेंगलोर, गोवा, हुबळी, म्हैसूर, अहमदाबाद आदी ठिकाणच्या बुलेट वापरणारे शेकडो मोटरसायकलस्वार या क्लबमध्ये सामील झाले. या क्लबमार्फत विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात येतात. भारत सरकारच्या बेटी बचाव, बेटी पढाव, भारत के फौजी के हौसला अफजाईओमें अशी एक लाख किमीची सफर देशात या क्लबच्या माध्यमातून विविध भागात यशस्वीपणे राबविण्यात आली. या क्लबमध्ये सामिल होणारे विविध राज्यातील बुलेट बाईकस्वार स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने गुहागरमध्ये येत असल्याने कोकणातील निसर्गसौंदर्याबरोबरच अप्रतिम खाद्यपदार्थांची ओळख देशात व परदेशात होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button