रत्नागिरीमध्ये “बेअकली जनता पार्टी”चे लोकं आले होते-उद्धव ठाकरे

कोकण सध्या राजकीय सभांमुळे चांगलाच ढवळून निघाला आहे. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात चुरशीची लढत होत आहे. इथे भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत रिंगणात आहेत.राणेंसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रत्नागिरीत जाहीर सभा घेतली. या सभेनंतर आता उद्धव ठाकरे यांची तोफ कणकवलीत धडाडली आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेतून अमित शाहांवर टीका केली आहे.कोकण तर माझं घरचं आहे. आपलं नातं मोदी शाहांसारखं नाहीये, बहोत पुराना रिश्ता है. कोकणातील काम संपल्यावर तुम्ही सर्वजण मला मुंबईत हवे आहेत. अमित शाहांनी गुजरात मधील टूर कॅपन्यांना सांगितले की सभी का टूर कॅन्सल करो. आता मी येतो म्हटल्यावर मला धमक्या देणं सुरू केलंय. आज रत्नागिरीमध्ये “बेअकली जनता पार्टी”चे लोकं आले होते. हे आपल्याला नकली म्हणतात. बेअकली जनता पार्टीचे सरदाराने येऊन मला आव्हान दिलं. पण, मी म्हणतो शाहांनी कोंबडी चोरावर बोला, असं प्रतिआव्हान ठाकरे यांनी दिलं आहे.अमित शाहांना ठाकरेंचं आव्हानअमित शाह आम्हाला अयोध्येत राम दर्शनासाठी का गेले नाही म्हणून विचारत आहेत. मग तुम्ही तुळजाभवानी मंदिरात गेला आहात का? मी काळाराम मंदिरात गेलो होतो, त्याचं महत्त्व माहीत आहे का? बाबासाहेब आंबेडकर हे काळाराम मंदिरात गेले होते. त्यावेळी तुमच्यासारख्या बूरसटलेल्या लोकांनी त्यांना रोखले होते. मी सावरकारांवर विधानसभेत बोललो आहे. शामा प्रसाद मुखर्जीबद्दलभाजप नेते का बोलत नाही? ते मुस्लिम लीगसोबत गेले होते ना? भाजपच्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांबद्दल मला आजही आस्था आहे. एका बाजूला विनायक आणि दूसऱ्या बाजूला खलनायक अशी परिस्थिती आहे, अशी टीका ठाकरेंनी केली.मोदी सरकार आता गझनी सरकार आहे. त्यांचे या आधीचे थापानामा बाहेर काढा. तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही त्याला आम्ही काय करणार? म्हणून यांना आमची मुलं कडेवर लागतात. ज्याला बाळासाहेबांनी बाहेर काढला होता. त्यांना तुम्ही सोबत घेता. 2005 पर्यंत याची मस्ती होती. श्रीधर नाईक, गोवेकेर, कसे गायब झाले? त्यांच्या हत्या कशा झाल्या? असा सवाल यावेळी ठाकरेंनी उपस्थित केला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button