
मुदत संपण्यापूर्वीच कोविड सेंटरमधील हंगामी कर्मचार्यांना शासनाकडून डच्चू, कर्मचाऱ्यांच्यात नाराजी
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कोविड सेंटर सुरू करण्यासाठी तीन तीन महिन्याच्या कालावधीसाठी करारावर घेण्यात आलेल्या कर्मचार्यांना सेवा समाप्त होण्यापूर्वीच कमी करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने काढले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी तीन तीन महिन्यांच्या करारावर कर्मचारी वर्गाची भरती जिल्हा आरोग्य विभागाने केली होती. सर्व कर्मचारी जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे सेवा बजावत होते. मात्र २७ ऑक्टोबर रोजी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने जा.क्र.शीशचीर/कोविड १९/मनुष्यबळ २०८२६-३२/ २०२० पत्राद्वारे महिला, उपजिल्हा, कोकण कृषी विद्यापीठ, सामाजिक न्याय भवन येथील सुरू असलेली कोविड सेंटर वगळून जिल्ह्यात बाकी सर्व कोविड सेंटर्समधील कर्मचारी आदेशाच्या दुसर्या दिवशीच म्हणजे २८ ऑक्टोबर रोजी कमी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मुदत संपली नसल्याने अचानक कामावरून कमी करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे
www.konkantoday.com