
लाॅकडाऊनची मुदत वाढल्याने जिल्ह्यात व्यापारी व व्यावसायिकांच्यात नाराजी
काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने काल उशिरा लाॅकडाऊनची मुदत पंधरा जुलै पर्यंत निर्णय जाहीर केला प्रशासनाच्या या निर्णयानंतर मात्र जिल्ह्यातील अनेक भागातून नाराजी व्यक्त होत आहे विशेषता छोट्याव्यावसायिक व व्यापारी संघटनांकडून या मुदतवाढीला विरोध होत आहे लाॅकडाऊन मुळे गेले काही महिने संपूर्ण व्यवहार ठप्प झाले हाेते त्यावर अवलंबून असणारे अनेकजण अडचणीत आले आहेत अनेकजण आर्थिक संकटात सापडले असून यावर अवलंबून असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे बऱ्याच महिन्यांच्या लाॅकडाऊन ऊठल्या नंतर मध्यंतरी बाजारपेठा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर परत एकदा १ जुलैला जिल्हयात लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली त्यामुळे काही प्रमाणात सुरळीत होत असलेले व्यवहार पुन्हा ठप्प झाले काेराेनाचे रुग्ण वाढतात ही वस्तुस्थिती असली तरी त्यावर लाॅकडाऊन हा उपाय नसल्याचे या सर्वांचे म्हणजे व्यापारी व व्यावसायिकांचे म्हणणे आहे याशिवाय जिल्हा प्रशासनाने काही व्यवसायांना लाॅकडाऊन मधून वगळले आहे त्यामुळे लाॅकडाऊनचा हेतू साध्य होत नाही इतर व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली तरी जिल्हा प्रशासनाने सूट दिलेल्यानी व्यवसाय सुरू ठेवल्यानंतर त्याचे कडुन कोराेनाचा फैलाव होणार नाही का असा सवाल या मंडळींकडून उपस्थित केला जात आहे .प्रशासनाने नियम घालून व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्याची अनेक भागातून मागणी होत आहे लोक प्रतिनिधी व काही राजकीय पक्षांकडूनही तशी मागणी होत आहे या मागणीसाठी काही तालुक्यातून प्रशासनाकडे निवेदने देण्यात येणार आहेत
www.konkantoday.com