
लांजा तालुक्यातील कोर्ले गावामध़्ये पोस्टमन म्हणून काम करणार्या ५७ वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण
लांजा तालुक्यातील कोर्ले गावामध़्ये पोस्टमन म्हणून स्थानिक पातळीवर काम करणार्या ५७ वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. स्थानिक पातळीवर कोरोनाची लागण होण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना आहे. यामुळे तालुक्यात खळबळ ऊडाली अाहे. तालुका प्रशासनाने हि माहिती दिली.कोर्ले मधलीवाडी येथील ५७ वर्षीय प्रौढ असलेल्या गृहस्थांकडे दि . १ जून रोजी मुंबईहून ९ जण चाकरमानी आल्यानंतर त्या सर्वाना होम क्वाँरंटाईन करण्यात आले होते.त्यावेळी स्थानिक असलेले हे ५७ वर्षीय गृहस्थांना देखील होम क्वाँरंटाईन करण्यात आले होते.
www.konkantoday.com