
प्रसिद्ध अभिनेते आमिर खान सिंधुदुर्ग जिल्ह्यात अचानक दाखल
प्रसिद्ध अभिनेते आमिर खान काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात अचानक दाखल झाले. ते, सहकुटुंब सिंधुदुर्गनगरी येथील पोलिस परेड मैदानावर दोन हेलिकॉप्टरने आले. येथून ते बंदोबस्तात कुडाळच्या दिशेने वाहनाने गेल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यासमवेत पत्नी व मुलगी आहे. ते, भोगवे येथे काही दिवस वास्तव्य करणार असल्याचेही समजते; मात्र याबाबत सुरक्षा यंत्रणेने कमालीची गोपनीयता बाळगली आहे
. www.konkantoday.com