
विदर्भच नव्हे तर कोकण आणि मराठवाड्यातही काेराेनाचा धोका वाढल्याचं कॅबिनेट बैठकीत माहिती सादर
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये या महिन्यापासून अचानक वाढ व्हायला लागली आहे. नुसती रुग्णवाढ नव्हे तर कोरोना मृत्यूंचं प्रमाणही वाढत असल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत सादर करण्यात आली. विदर्भातल्या दोन जिल्ह्यांमध्ये जेवढ्या रुग्णांची कोरोना चाचणी मागच्या आठवड्यात झाली, त्यातल्या ४० टक्क्यांहून अधिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राज्य सरकारने आता सर्वाधिक लक्ष देण्याची गरज असलेले ५ जिल्हे समोर आणले आहेत. त्याचबरोबर विदर्भच नव्हे तर कोकण आणि मराठवाड्यातही धोका वाढल्याचं कॅबिनेट बैठकीत सादर झालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालंसर्वाधिक लक्ष द्यावेत असे जिल्हे विदर्भातले असले आणि रुग्णवाढ सर्वाधिक प्रमाणात याच विभागात झालेली असली तरी कोरोनामुळे मृत्यूचं थैमान वाढलं आहे कोकण आणि मराठवाड्यात.लातूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात रुग्णांचा मृत्यूदर ४ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. १५ फेब्रुवारीनंतर सर्वाधिक मृत्यूदर लातूर जिल्ह्यात ४.३९ टक्क्यांवर झालेला दिसतो.
www.konkantoday.com