
कोकण रेल्वेचा वेग वाढल्याने प्रवाशांना दिलासा.
कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेचे वेळापत्रक दोन टप्प्यात चालवले जाते. पहिल्या टप्प्यात एक नोव्हेंबर ते ९ जून हा उन्हाळी हंगामातील वेळापत्रक नियोजनाचा कालावधी असतो तर पावसाळी हंगामासाठी वेगावर मर्यादा ठेवून १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये गाड्यांचा वेग निश्चित केला जातो. नव्या वेळपत्रकानुसार गाड्यांचा वेग ताशी १३० ते १६० किमी राहील. यामुळे या मार्गावर वेगवान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस अवघ्या ७ तास ४५ मिनिटामध्ये मुंबईहून मडगावला पोहोचणार आहे. तर तेजस एक्सप्रेस ९ तास १० मिनिटांमध्ये मडगावला पोहोचणार आहे. जनशताब्दी एक्सप्रेस ही ९ तास २० मिनिटामध्ये मुंबईहून मडगावला पोहोचणार आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.