
मिर्या-नागपूर रस्त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी रवाना
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या कामालाही आता गती प्राप्त झाली आहे. या मार्गाच्या भूसंपादनाच्यावेळी साळवी स्टॉप ते हातखंबा या मार्गावरील व्यापार्यांनी रस्त्याच्या रूंदीकरणावरून आक्षेप घेतले होते. चौपदरीकरणासाठी ४५ मीटर ऐवजी ३० मीटर रूंदीकरण करावे अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर प्रशासनाकडून या मागणीचा कोणताही विचार झाला नाही व कुवारबांव येथे ७०० मीटर लांबीच्या व रस्त्याची ४५ मीटर रूंदीकरणासाठी पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्यात आली.
मिर्या ते साखरपा अशा ४८ कि.मी. मार्गाच्या थ्रीडीची प्रक्रिया पूर्ण झाली असून यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचा ७०० कोटींचा प्रस्ताव संबंधित खात्याकडे पाठविण्यात आला आहे. मिर्या नागपूर या महामार्गावर साळवी स्टॉप, जे. के. फाईल्स, कुवारबांव, खेडशी व नाणीज येथे फ्लायओव्हर होणार असून शहरातील चर्मालय, गयाळवाडी, चांदसुर्या यांच्यासह या मार्गावर ११ पुलही बांधण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या महामार्गाचे काम सुरू होणार आहे.
www.konkantoday.com