
लोकसभा निवडणुकीत चिपळूण मतदारसंघात आघाडी देणार्यांचे खा. विनायक राऊत यांच्यावतीने आभार
चिपळूण ः लोकसभा निवडणुकीत अवघ्या चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातून तब्बल ७६ हजार, अवघ्या चिपळूण शहरातून ६ हजाराचे मताधिक्य घेतलेल्या खासदार विनायक राऊत यांची मोठ्या उत्साहात व जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्त सेना व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आनंदोत्सव साजरा केला.
चिपळूण दौर्यावर आलेल्या खा. राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मिरवणूक बाजारपेठेतून काढण्यात आली. सेना-भाजपचे झेंडे एकत्रितपणे फडकवत तसेच ढोल ताशांचा गजर, फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली.