
खेड तालुक्यातील भरणे-बौद्धवाडी येथे एकास लोखंडी रॉडने मारहाण, दोन महिलांसह चौघांवर गुन्हा.
खेड तालुक्यातील भरणे-बौद्धवाडी येथे एकास लोखंडी रॉडने मारहाण करत गंभीर दुखापत केल्याप्रकरणी साहिल मिलिंद जाधव, रोशन मिलिंद जाधव यांच्यासह दोन महिलांवर सोमवारी रात्री येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुदर्शन सुनील जाधव असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्यासह वाडीतील मंजुशा जाधव यांच्या जागेची मोजणीची फिर्यादी यांना लगतदार म्हणून नोटीस आल्याने त्या ठिकाणी हजर होते. मोजणीदरम्यान जमिनीच्या कारणावरुन संशयितांनी त्यांना शिवीगाळ करून शाब्दीक वाद घातला. दोन महिलांनी त्यांना पकडून ठेवत एका महिलेने लोखंडी रॉडने मारहाण केली. वडील सुनील जाधव यांनाही शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.www.konkantoday.com