
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५२ व्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडणार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५२ व्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धेचे बक्षीस वितरण बुधवार दि. २३ रोजी सायंकाळी ४ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे. यानंतर प्रथम क्रमांक विजेते पारथ या नाटकाचे सादरीकरण होणार असल्याची माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.बक्षिस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट, नाटक, दूरदर्शनवरील मालिकांमधील अभिनेते आणि आकाशवाणीचे कलाकार वामन जोग आणि अध्यक्षस्थानी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित राहणार आहे.
याशिवाय विशेष उपस्थिती मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी गिरीश देशमुख, महाव्यवस्थापक मोहनदास भरसट, मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनवडेकर, रा.प. नियंत्रण समिती क्रमांक १ च्या प्रादेशिक व्यवस्थापक समिती जोशी उपस्थित राहणार आहेत.रा. प. महामंडळघतील अधिकारी, कर्मचार्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता क्रीडा, क्रिकेट व नाट्य स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले जाते. ५२ व्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेर्या पुणे, सोलापूर, नांदेड, सांगली व नाशिक या ५ केंद्रांवर ८ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत झाल्या होत्या. प्राथमिक केंद्रातून प्रथम क्रमांक प्राप्त नाट्यकृती यांची अंतिम फेरी नांदेड केंद्रावर १४ ते १८ जानेवारीदरम्यान झाली.www.konkantoday.com