
राजीनामा द्या, देशावर उपकार करा,” संजय राऊत यांची अमित शहा यांच्यावर टीका
संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन अमित शाहांचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अमित शाहांबरोबरच संयुक्त राष्ट्र आणि भारतीय जनता पार्टीच्या अकाऊंटलाही टॅग केलं आहे. अमित शाहांचा फोटो पोस्ट करत राऊतांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अमित शाहांचा सर्व वेळ सरकारं बनवण्यात आणि पाडण्यात जात असून त्यांचा मेंदू 365 दिवस विरोधकांना संपवण्यासंदर्भातील कट रचण्यात व्यस्त असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.
“राजीनामा द्या! संपूर्ण वेळ केवळ सरकारं बनवण्यात आणि पाडण्यात जातोय. राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी कट रचण्यामध्ये 365 दिवस मेंदू व्यस्त असतो. लोकांची सुरक्षा राम भरोसे आहे. आता रामसुद्धा या लोकांना कंटाळला आहे. राजीनामा द्या, देशावर उपकार करा,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.