
महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी मार्फत पाकिस्तान चा झेंडा जाळून निषेध.
निष्पाप लोकांचे जीव घेणारा पाक कसा असेल तो नापाक आहे पापीच आहे असे म्हणत त्यांचा पापीस्तान असा उल्लेख करत त्यांचा झेंडा जाळून काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला.काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद आज रत्नागिरी येथे देखील उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी मार्फत पाकिस्तान चा पापीस्थान असा उल्लेख करत मुर्दाबाद च्या घोषणा देत पाकिस्तानी झेंडा जाळून निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर तालुकाध्यक्ष सचिन शिंदे शहरअध्यक्ष बाबय भाटकर महिला शहर सचिव संपदा राणा रुपाली गोसावी कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम अवधूत पिलणकर इत्यादी उपस्थित होते