
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला नव्या एसटीमधून प्रवास.
खेड आगाराच्या ताफ्यात बीएस प्रणालीच्या ५ नवीन बस दाखल झाल्या आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते येथील स्थानकात नव्या बसचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पणानंतर गृहराज्यमंत्र्यांनी येथील बसस्थानक ते भरणे हॉटेल बिसूपर्यंत प्रवास करून नव्या बसच्या प्रवासाचा अनुभव घेतला.

येथील आगार बीएस प्रणालीच्या नव्या बसच्या प्रतीक्षेत होते. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे कदम यांनी पाठपुरावा करून येथील आगारासाठी नव्या बस उपलब्ध करून देण्यासाठी आग्रह धरला होता. त्यानुसार नवीन गाड्या एसटी प्रशासनाच्या ताब्यात आल्या आहेत.www.konkantoday.com