
उपनिषदातील योगविद्येचे ज्ञान जाणून घेण्याची रत्नागिरीकरांना सुवर्ण संधीडॉ परमपूज्य स्वामी परमार्थदेव जी करणार मार्गदर्शन
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र आणि पतंजली परिवार रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने अरिहंत मॉल येथील रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता “उपनिषदातील योगविद्या” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हरिद्वार येथील पतंजली योगपीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी आणि योगगुरू स्वामी रामदेव बाबांचे परमशिष्य डॉ परमपूज्य स्वामी परमार्थदेव जी *उपनिषदातील योगविद्या* या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय परंपरेत असणारे आणि आपल्या प्राचीन ग्रंथात असणारे ज्ञान एका वेगळ्या धाटणीत ऐकण्याची सुवर्णसंधी रत्नागिरीकरांना प्राप्त होणार आहे.तरी सर्व योगप्रेमी रत्नागिरीकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांनी केले आहे.