
युपीआयद्वारे तिकिट विक्रीतून रत्नागिरी विभागाला मिळाले २४ लाख ५६ हजारांचे उत्पन्न.
तिकिट काढल्यानंतर सुट्ट्या पैशांवरून एसटी बसमध्ये वाहन, प्रवाशांमध्ये होणारा वाद टाळण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने युपीआय पेमेंट प्रणाली सुरू केली आहे. यामुळे गाड्यांमध्ये होणारे वाद तुर्तास टळले असून, अवघ्या बारा दिवसात युपीआयद्वारे तिकिट काढल्यामुळे रत्नागिरी विभागाला ५६ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.
एसटी गाड्यांमध्ये तिकिट काढताना सुट्ट्या पैशांची कायम समस्या निर्माण होते. ही समस्या सोडविण्यासाठी एसटी महामंडळाने मोबाईलद्वारे ऑनलाईन व्यवहार करावेत, अशी मागणी प्रवाशांमधून सुरू होती. त्यानुसार महामंडळाने अँड्रॉईड इलेक्ट्रॉनिक तिकिट इश्यू मशिन (ईटीआयएम) सर्व आगारांना दोन महिन्यापूर्वी उपलब्ध करून दिली आहे.www.konkantoday.com