
आयटीआय संगमेश्वर येथे रद्दी विक्रीसाठी निविदा सादर करण्याचे आवाहन.
रत्नागिरी, दि.9 :- औद्योगिक प्रशिक्षण संगमेश्वर या संस्थेमधील वाळवी लागलेल्या पुस्तकांची रद्दी व इतर रद्दी यांची विक्री करायची आहे. यासाठी इच्छुकांनी बंद लिफाफ्यामार्फत निविदा (दरपत्रक) 19 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संगमेश्वर या कार्यालयात सादर करावीत. 21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सदर निविदा भांडार समितीसमोर उघडण्यात येतील. दरपत्रक सादर करणारे इच्छा असल्यास वेळोवेळी हजर राहू शकतात. दरपत्रकामध्ये पुस्तकाच्या रद्दीचा प्रति किलो दर नमूद करावा. निविदेच्या बंद लिफाफ्यावर नाव, पूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांक नमूद करावा, असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर आर. व्ही. कोकरे यांनी कळविले आहे.
पुस्तकाची रद्दी संस्थेच्या भांडार विभागात सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत (सुटीचे दिवस वगळून) पहावयास मिळेल. कोणतेही दरपत्रक कोणतेही कारण न देता नाकारण्याचा किवा संपूर्ण रद्द करण्याचा अधिकार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी राखून ठेवलेला आहे. साहित्याची शासन नियमाप्रमाणे अपेक्षित रक्कम न आल्यास सर्व निविदा रद्द करून नव्याने निविदा मागविण्यात येतील.
ज्यांच्या नावे निविदा मंजुर होईल त्यांनी रक्कम लेखा विभागात जमा करून सर्व साहित्य स्वखर्चाने घेऊन जावयाचे आहे जर साहित्य वेळेत नेले नाही तर संस्थेची कोणतीही जबाबदारी रहाणार नाही. निविदा सादर करताना ती संगणकीय टंकलिखित असावी हस्तलिखित सादर करू नये. हस्तलिखित निविदा ग्राह्य धरली जाणार नाही. निविदेमध्ये शब्दात अथवा अंकात कोठेही खाडाखोड नसावी. खाडाखोड ग्राह्य धरली जाणार नाही.