
भाड्यावरून वाद, असुर्डे येथे प्रवाशाचा रिक्षा चालकावर सुरीने हल्ला.
चिपळूण-असुर्डे रेल्वे ब्रिजचे पुढे रिक्षाचे भाडे देण्यावरून वाद झाला असता प्रवासी असलेल्या संशयिताने रिक्षा चालकावर सुरीने हल्ला केला. यात चालक गंभीर जखमी झाला. ही घटना दि. 31 मार्च रोजी सायंकाळी 7.45 वाजता झाली.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजित तुकाराम गावणंग (वय ५१ वर्षे, रा. आगवे मधलीवाडी)हे आरोपी प्रवासी विनोद चंद्रकांत कदम (वय 35, एगाव, बौद्धवाडी, ता. चिपळूण) यास रिक्षाने येगाव बौध्दवाडी येथे घेवून जात असताना रिक्षाचे भाडे देणेवरुन वाद घालुन आरोपी कदम याने फिर्यादी यांना सुरीने मानेचे मागील बाजुस पाठीवर मारुन दुखापत केली. या हल्ल्यात अजित जखमी झाले आहेत म्हणून सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला