
कोविडने मृत पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत नसल्याने विम्याचे कवच दिले नाही आणि आता मेस्मा कसा लावताय,भाजपचा सवाल
संपकरी एसटी कर्मचारी कामावर रूजू न झाल्यास त्यांच्यावर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.तर, दुसरीकडे भाजपने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोविडने मृत पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत नसल्याने विम्याचे कवच दिले नाही आणि आता मेस्मा कसा लावताय, असा थेट सवाल भाजपने केला आहे.
आमदार सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री टीका केली आहे. कोविड काळात अनेक एसटी कर्मचारी हे कोविडमुळे मरण पावले. तेव्हा सरकारकडून या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांचा विमा देण्यात आला नव्हता. त्यासाठी एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवेत नसल्याचे सांगण्यात आले. आता मात्र, कारवाई करण्यासाठी एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवेत आले का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
www.konkantoday.com