
चिपळुणात तीनशेहून अधिक एसटी बसेस दाखल
मुंबई, पुणे येथून गणेशोत्सवासाठी बहुसंख्य चाकरमान्यांना घेवून जवळपास ३०० हून अधिक एसटी बसेच चिपळूण आगारात दाखल झाल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठी त्यातील काही गाड्या आताच चिपळूण आगारात थांबवून घेण्यात आल्या आहेत. यामुळे शहरातील शिवाजीनगर बस स्थानक एसटीचा तळ बनले आहे. या ठिकाणी व बहाद्दूरशेख नाका येथील मैदानात शेकडो गाड्या पार्क करण्यात आल्या आहेत. मात्र जागा अपुरी पडत असल्याने चौपदरीकरण केलेल्या महामार्गावरही ठिकठिकाणी एसटीच्या गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.
. या गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे अडीच हजार एसटी बसेस दाखल झाल्या आहेत. चिपळुणात जवळपास ३०० हून अधिक बसेसच्या नोंदी झाल्या आहेत.
www.konkantoday.com