
देवगड अल्फान्सो (हापूस) आंब्याच्या नावाने बाजारात होणारी तोतयेगिरी होणार बंद.
देवगड अल्फान्सो (हापूस) आंब्याच्या नावाने बाजारात होणारी तोतयेगिरी आणि बनावट आंब्याची विक्री रोखण्यासाठी हापूस (अल्फान्सो) च्या भौगोलिक संकेत (जीआय) टॅगची रजिस्टर्ड प्रोप्रायटर असलेल्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने या वर्षापूर्वीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर टँपर प्रुफ युआयडी सील सक्तीचे कर्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रत्येक अस्सल देवगड हापूस आंब्यावर हा खास टँपर प्रूफ युआयडी सील स्टीकर लावणे बंधनकारक असेल आणि असे युआयडी असलेले आंबेच देवगड हापूस किंवा देवगड अल्फान्सो म्हणून विक्री किंवा विपणन करता येणार आहेत.
देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादितचे संचालक सदस्य ऍड. ओंकार एम. सप्रे म्हणाले की, देवगड तालुक्यातील हापूस आंबा गेल्या शतकापासून अधिक काळ आपल्या विशिष्ट सुगंध व चवीसाठी प्रसिद्ध आहे. आणि त्याला बाजारात मोठी मागणी आहे. मात्र, सध्या देवगड हापूसच्या नावाखाली विक्री होणारे ८० टक्क्यापेक्षा जास्त आंबे हे वास्तविक देवगडमधील नाहीत.www.konkantoday.com