
कीर्तनकार कोकरे यांच्या संस्थेच्या खात्यावर गाईंच्या चाऱ्यासाठी शासनाकडून ३३ लाख ४५ हजार रुपये जमा, तरीदेखील उपोषण सुरूच ठेवणार.
कोकणातील सर्वात मोठी गो शाळा असलेल्या श्री ज्ञानेश्वर मुक्तीधाम सेवा संस्थेच्या गो शाळेतील अकराशे गाईंना अनेक समस्यांमुळे सांभाळणे कठीण बनल्याने कीर्तनकार भगवान कोकरे यांनी तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाला मोठे यश मिळाले असून राज्य सरकारने तातडीने महाराष्ट्र गो सेवा आयोगामार्फत राज्यातील सर्वच गोधन संवर्धन करणाऱ्या संस्थांना कोट्यवधीचा निधी काल मंगळवारी अदा केला.
कीर्तनकार कोकरे यांच्या संस्थेच्या खात्यावर गाईंच्या चाऱ्यासाठी ३३ लाख ४५ हजार रुपये जमा केले आहेत, अशी माहिती उपोषणकर्ते भगवान कोकरे यांनी दिली हे यश मिळाले असले तरी संस्थेला गो शाळेसाठी दिलेल्या जागेबाबत, गो शाळेला दिलेल्या वाणिज्य दराच्या वीज जोडणी व पंचवीस लाख रुपयांच्या प्रलंबित अनुदानाच्या रकमेबाबत सरकार जो पर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले आहे.