
रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदा वाळू उत्खननामुळे वाळू लिलावांना ब्रेक.
रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली, चिपळूण, खेड, संगमेश्वर, रत्नागिरीतील काही खाड्यांमध्ये व समुद्रकिनार्यांवरून वाळूचे बेकायदा उत्खनन सुरू आहे. या बाबत जिल्हा प्रशासनाकडून कारवाईही करण्यात येवूनही ह उत्खनन चोरीछुपे सुरू असते. त्याचा फटका या भागातील वाळू गटांच्या जाहीर होणार्या लिलावांना बसला आहे. मात्र मागील काही वर्षात महसुलात झालेल्या घटामुळे हे लिलाव थांबल्याची चर्चा सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामधून शासनाला वाळूतून मिळणार्या महसुलात घट झाल्याची बाब नव्या राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या घेतलेल्या आढाव्यात समोर आले आहे. महसूल वाढीसाठी नव्या शासनाने वाळू विषयातही लक्ष केंद्रीत केले आहे.www.konkantoday.com