चिपळूण शहरातील पेठमाप भागातील समीर विद्याधर वरवाटकर यांचा बुलेटवरून सात राज्यातून ६,५०० किमी प्रवास

चिपळूण शहरातील पेठमाप भागातील समीर विद्याधर वरवाटकर यांनी सात राज्यातून बुलेट दुचाकीवरून ६,५०० किलोमीटरचा प्रवास करून एक वेगळा विक्रम केला आहे. असा विक्रम करणारा चिपळूण शहरातील हा एकमेव तरूण ठरला आहे.समीर तथा भैय्या वरवाटकर यांनी हा प्रवास चिपळूण ते संभाजीनगर, नागपूर, प्रयागराज महाकुंभ, वाराणी काझी, अयोध्या, आग्रा, नैनिताल, कैचीधाम, हरिद्वार, हिमाचल प्रदेश, मंडीशराधर शिवमंदिर, चंदीगढ, अंबाला, सोनीपत, जयपूर, उज्जैन, मध्यप्रदेश, महाकाल दर्शन, इंदोर, नाशिक, पुणे ते चिपळूण असा हा विक्रमी प्रवास केला आहे.

या प्रवासादरम्यान आपल्याला कोणताही वाईट अनुभव आला नाही, असे त्यांनी आवर्जुन सांगितले.यापूर्वी चिपळूण ते नेपाळ असा दोनवेळा व चिपळूण ते भूतान असा एकवेळा, अशा तीन इंटरनॅशनल राईडस त्यांनी पूर्ण केले आहेत. तसेच रायडर लोकांचे स्वर्ग म्हणजेच लेह लडाख त्यांनी दोनवेळा पूर्ण केले आहे. तसेच चिपळूण ते कन्याकुमारी, अष्टविनायक, गोवा दहावेळा इंडिया बाईक विक गोवा पाचवेळा, चिपळूण ते नाणेघाट वन राईड इंडिया अशा अनेकवेळा त्यांनी राईडस पूर्ण केल्या आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button