
राजापूर डोंगर तिठा येथे खासदार यांच्या उपस्थितीतच प्रशासनाचे नियम डावलून सभा
सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन डाऊन आणि सोशल डिस्टंसिंग चे नियम प्रशासनाने ठरविले असतानादेखील राजापूर डोंगर तिठा येथे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सभा झाली कुठलीही सभा किंवा मीटिंग घ्यायची असेल तर प्रशासनाची परवानगी घेणे जरुरीचे आहे त्याशिवाय प्रशासनाने लग्नकार्य वगळता अन्य कुणालाही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यास परवानगी दिलेली नाही तरीदेखील लोकप्रतिनिधी असलेले खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत ही सभा घेण्यात आली विशेष म्हणजे या सभेला मोठ्या संख्येने
एकत्र येत सभेत सहभाग घेतला याशिवाय सभेत सहभागी झालेल्या ने सोशल डिस्टंसिंग चे कोणतेही नियम पाळले नाहीत उलट एकमेकांना चिकटूनच लोकप्रतिनिधींच्या समोरच लोक बसलेली होती जिल्हा प्रशासन याबाबत नेमकी कोणती भूमिका घेणार आहेत असा सवाल जनता विचारत आहे
www.konkantoday.com