कुरधुंडा गावच्या सरपंच पदी नाझिमा बांगी यांची बिनविरोध निवड

संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा ग्रामपंचायतच्या सरपंच पदी कुरधुंडा गावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचात सदस्य नाझिमा हसन बांगी यांची बिनविरोध निवड करण्यात झाल्याने गावाच्या वितीने त्यांचे आभार मानण्यात आले आहे.गावच्या विकासासाठी पालकमंत्री ना. उदयजी सामंत आणि किंगमेकर आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून विकासासाठी प्रयत्नशील राहणार असून गावाच्या विकासा बरोबर पाणी आणि आरोग्य, शिक्षण, शासकीय योजना हा अजंठा घेऊन पुढे जाणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच नाझीमा बांगी यांनी दिली आहे.जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांच्या आदेशा नंतर आज देवरूखचे नायब तहसीलदार सुदेश गोताड यांच्या प्रमुख उपस्थीतीत ही निवडणूक संपन्न झाली. आजच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नाझीमा बांगी यांची बिनविरोध निवड केल्याने त्यांचे गावाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

यावेळी प्रभारी सरपंच तैमूर अलजी, माजी सरपंच सबा अलजी, जमूरत अलजी, शाहिस्तां एलजी, पोलिस पाटील नफिसा फकीर, नाझीम अलजी, ग्रामसेवक श्रेय्या भायजे, सर्कल तलाठी संदेश घाग जमातीचे सदर असगर अलजी, अब्दुल्ला मालगुंडकर, उमर अलजी, लियाकत काझी, साबीर मालगुंडकर, शौकत अलजी, इरफान नेवरेकर, रइस अलजी, अरफात फकीर, हुसैन अलजी, फैय्याज हाजू, अन्वर गोलंदाज,सऊद धामस्कर, समरान खान, संजय जाधव, आवेज बांगी, अल्पसंख्याक उपतालुका प्रमुख शकील डिंगनकर, जिब्रान तांडेल,आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button