
रत्नागिरी शहरातील पेठ किल्ला येथील प्रसिद्ध असलेल्या ज्योतिबा मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न.
रत्नागिरी शहरातील पेठ किल्ला येथील प्रसिद्ध असलेल्या ज्योतिबा मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक वीरेंद्र वणजू आणि योगिता वणजू यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.पेठ किल्ला येथील ज्योतिबा मंदिराचा जीर्णोध्दार करण्याचा निर्णय मंडळा मार्फत घेण्यात आला. शुक्रवार ७ मार्च रोजी हा पायाभरणी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वणजू दांपत्यासह संस्थेचे अध्यक्ष राजन शेट्ये, उपाध्यक्ष अजय गांधी,सचिन गांधी,अमोल गांधी,बाळा गांधी,नरेंद्र वणजू, श्री भाटकर व इतर पदाधिकारी व भक्तगण उपस्थित होते.
पेठ किल्ला येथील ज्योतिबा खेट्यांसाठी प्रसिद्ध आहे. खेट्यांच्या काळात अनेक भाविक मंदिरात घेरी लावून खेटे घालत आपला नवस बोलतात. भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ज्योतिबा मंदिरात दरवर्षी हजारो भक्त हजेरी लावतात. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी भक्तांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे