
मुंबई विद्यापीठाचे सलग तिसर्या वर्षी कला मार्गदर्शक म्हणून विलास रहाटे यांची निवड.
देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांची मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघाच्या फाईनआर्ट कलाप्रकारासाठी मार्गदर्शक म्हणून सलग तिसर्या वर्षी निवड करण्यात आली आहे.अखिल भारतीय विद्यापीठ आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवक महोत्सव उत्तरप्रदेशात सुरू आहे. मुंबई विद्यापीठाचे कला मार्गदर्शक म्हणून विलास रहाटे यांच्यासोबत केशर चोपडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
एकाच शैक्षणिक वर्षात राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव, पश्चिम विभाग आंतरविद्यापीठीय महोत्सव, राष्ट्रीय युवा महोत्सव अशा तीन टप्प्यात सांस्कृतिक कलाविषयक स्पर्धा आयोजित केल्या जातात. विलास रहाटे यांनी सन २०२२ ते २०२५ अशी तीन वर्षे मुंबई विद्यापीठासाठी कला मार्गदर्शकाची जबाबदारी स्वीकारली आहे.www.konkantoday.com