जागतिक महिला दिनी रत्नागिरी परीट समाजाच्या भगिनी बनल्या बाल सुधारगृहातील अनाथांच्या माय

रत्नागिरी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी परिट समाजाच्या भगिनींनी आज दिनांक 8 मार्च रोजी रत्नागिरी येथील बालसुधारगृह तथा रिमांड होमला सदिच्छा भेट देऊन तेथील अनाथ मुलांना ब्लॅंकेट, शैक्षणिक आणि चित्रकला साहित्य दिले आणि खाऊ वाटप केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सिंधुताई सकपाळ यांच्या स्मृती जागवत बालसुधारगृहातील अनाथांच्या माय झाल्याचे समाधान लाभल्याच्या भावना परीट समाज भगिनी मंडळाच्या अध्यक्ष सौ. स्वप्नाली प्रीतम पावसकर आणि उपाध्यक्ष सौ. गार्गी वीरेंद्र कोरगावकर यांनी व्यक्त केल्या.

यावेळी मंडळाच्या सचिव सौ प्रणिती मंगेश नाचणकर, खजिनदार स्मिता मंदार कोरगावकर यांच्या समवेत मंडळाच्या सदस्या सौ. संगीता कासेकर, सौ सुप्रिया कोरगावकर, सौ. रूपा कडू, सौ. कल्पना मोहिते, सौ मुक्ता म्हस्के, सौ. जानकी कोरगावकर, ज्येष्ठ सल्लागार भगिनी सौ. कल्पना नाचणकर, सौ सुषमा कासेकर, सौ. सुलभा कासेकर, श्रीमती शारदा कोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित महिलांनी तेथील प्रत्येक विद्यार्थ्यांशी आपुलकीने हितगुज साधताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांनी दिलेल्या संदेशानुसार शिका, ज्ञानी व्हा आणि राष्ट्राचे आदर्श नागरिक बना, अशा शुभेच्छा त्यांना दिल्या.

यावेळी बाल सुधारगृहाचे अधीक्षक श्री. प्रथमेश वायंगणकर आणि शिक्षक श्री. विनोद पोवार यांनी रत्नागिरी परीट समाज भगिनी मंडळाच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या भेटवस्तू आणि खाऊचा स्वीकार केला. संस्थेने महिलांना हा उपक्रम राबविण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल भगिनी मंडळांनी त्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button