
राष्ट्रीय भ्रष्टाचार नियंत्रण आणि जनकल्याण संस्थेच्या जिल्हा समन्वयकपदी प्रसाद सावंत यांची नियुक्ती
रत्नागिरी : भारत सरकार अंगीकृत आणि निती आयोगच्या अधिपत्याखाली असणाऱ्या राष्ट्रीय भ्रष्टाचार नियंत्रण आणि जनकल्याण संघठनच्या रत्नागिरी जिल्हा समन्वयकपदी प्रसाद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय समितीने त्यांच्या नावाची नुकतीच घोषणा केली आहे.ही संस्था भ्रष्टाचारमुक्त, मानवी हक्क समर्थन, सामाजिक विकास, संशोधन, प्रशिक्षण, भारतातील मानवी हक्क भाल्यांमध्ये नवीन घडामोडी आणि अंमलबजावणी सुरू करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी मोहिमांना प्रोत्साहन देते.
भ्रष्टाचार नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याबरोबरच जनतेच्या हितासाठी कायम अग्रेसर राहून त्यांना आधार देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असेल, असे सांगतानाच या पूर्वीही मी या संस्थेबरोबर काम केले असून यावेळी बढती देण्यात आल्याने राष्ट्रीय समितीचे मी आभार मानतो आणि माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही प्रसाद सावंत यांनी दिली.या निवडीबद्दल प्रसाद सावंत यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.