
यंदाच्या वर्षापासून चित्र नाट्य विषयाला वाहिलेल्या दिवाळी अंकाला चित्रपट निर्मिती प्रमुख वसंतराव सरनाईक पुरस्कार.
मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने १९७५पासून गेली ४९ वर्षे दरवर्षी दिवाळी अंक स्पर्धा घेऊन विविध विषयांवरील दिवाळी अंकाला पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, महाराष्ट्रातील नामांकित दिवाळी अंकांचा या स्पर्धेत सहभाग असतो, चित्र नाट्य विषयाला वाहिलेल्या दिवाळी अंकाला यंदाच्या वर्षीपासून *चित्रपट निर्मिती प्रमुख वसंतराव सरनाईक स्मृती पुरस्कार* देण्यात येणार असून यंदाचा पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील ‘नवरंग रुपेरी’ या दिवाळी अंकाला जाहिर करण्यात आला आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई चे अध्यक्ष रवींद्र मालुसरे व या पुरस्काराचे प्रायोजक करवीर काशी फौंडेशन, कोल्हापूर चे अध्यक्ष डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांनी अंकाचे संस्थापक संपादक अशोक उजळंबकर यांचे अभिनंदन केले आहे.