
रत्नागिरी जिल्ह्यातील १,१०३ गावे हागणदारीमुक्त मॉडेल
रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार ५३३ गावांपैकी १ हजार १०३ गावे मॉडेल झाली आहेत. तर उर्वरित ४३० गावे हागणदारीमुक्त मॉडेल करण्यासाठी व दृष्यमान स्वच्छतेच्या दृष्टीने निरंतर प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी आपल्या परिसरातील व घरातील ओला व सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत केला जाणार आहे. यासाठी विविध विषयांच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी दिली.त्यासाठी जिल्ह्यात सोमवार ८ जुलै पासून विशेष मोहीम सुरू झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी दिली आहे. ८ जुलै ते ७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व गावात स्वच्छतेचे दोन रंग ओल्या कचर्यासाठी हिरवा तर सुक्या कचर्यासाठी निळा या नावाने अभियान राबविण्यात येणार आहे. www.konkantoday.com