
महापुरूषांच्या यादीत कुणाला बसवायचे याचा निर्णय घ्या ः विनायक राऊत
भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांचे राजकारण रक्तरंजित आहे. त्यामुळे ही अपप्रवृत्ती येथे आणू नका. रत्नागिरीला लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ओळख आहे. अशा महापुरुषांच्या यादीत कोणाला बसवायचे याचा विचार करावा, असे आवाहन विनायक राऊत यांनी केले.शहरातील माळनाका परिसरात असलेल्या मराठा भवन येथे शिवसेना-इंडिया आघाडीचा शहर मेळावा शुक्रवारी पार पडला. आयत्यावेळी शहराच्या या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमेदवार विनायक राऊत यांनी भाजपा उमेदवार नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. त्यांचा रक्तरंजित राजकीय इतिहास आहे, असे सांगून ही अपप्रवृत्ती कोकणात येवू देवू नका, असे आवाहन केले. केंद्र व राज्यातील भाजपा सरकारकडून भांडवलदारांचे हित पाहिले जात आहे. संगमेश्वरातील सह्याद्री पट्ट्यातील शेकडो एकर जमीन अदानी ग्रुपच्या घशात घातली जात आहे. मृत्यू पावलेल्या जमीन मालकांना त्यासाठी जीवंत करण्यात आले. परंतु मी कोणकची भूमी कोणाच्याही घशात घालू देणार नाही, असेही राऊत म्हणाले.भाजपाने आतापर्यंत हिंदू, मुस्लिम तेढ निर्माण करून आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर मराठा, कुणबी समाजाला झुंजवले. जे काही देशाचा विकास झाल्याचे दाखवले जात आहे. ती केवळ थापबाजी आहे. प्रत्यक्षात देशाला गरीबीच्या खड्ड्यात लोटले जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. www.konkantoday.com