
निलेश राणे आमदार झाल्यापासून शिवसेना जोमाने वाढत आहे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
कोकणात शिवसेना महायुतीचा भगवा झंजावात सर्वत्र दिसून येत आहे. निलेश राणे आमदार झाल्या पासून येथील शिवसेना संघटना जोमाने वाढत आहे. सोबतच विकास कामांचा धडाका ही सुरु असून तोही असाच सुरु राहणार आहे. मागील अडीज वर्षाच्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजनाच्या माध्यमातून केलेल्या कामाची पोचपावती जनतेने ऐतिहासिक विजयाच्या स्वरूपात दिली. यापुढेही जनतेचा विश्वास सार्थकी लावून महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेची सेवा करतंच राहणार. अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मालवण दौऱ्यात दिली.
दरम्यान, सिंधुदुर्ग दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला धक्का दिला. जिल्हाप्रमुख संजय पडते यांसह आजी माजी सरपंच व शेकडो उबाठा कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे यांसह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.कुणकेश्वर यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. त्या नंतर परिसरातील एका निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. संजय पडते यांसह गिरगांव कुसगाव सरपंच स्नेहा सावंत, यांसह असंख्य कार्यकर्ते, गोवेरी येथील कार्यकर्ते, माडयाची वाडी, सोनवडे तर्फ तुलासुली, रांजना येथील शेकडो उबाठा कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यांसह मुंबई येथील काँग्रेस पदाधिकारी व मूळ तळाणी अंगाणेवाडी येथील सुनील आंगणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी आमदार रवींद्र फाटक, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, संजू परब, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, आंनद शिरवलकर, विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, बाळू नाटेकर, बंटी तुळसकर, अरविंद करलकर, दादा साईल, रत्नाकर जोशी, किसन मांजरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, विनायक राणे, आबा धडाम, हर्षद पारकर, दीपलक्ष्मी पडते, सरोज परब, नगरसेविका चांदणी कांबळी, नैना मांजरेकर, श्रुती वर्धम, उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, सोनाली पाटकर, अंजना सामंत, सिद्धी शिरसाठ, तुळसकर, नाटेकर, सुनील घाडीगावकर, सुशांत घाडीगावकर, मकरंद राणे, छोटू ठाकुर, प्रितम गावडे, दिलीप बिरमोळे, ऋषिकेश सामंत यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.