
देवरूखात रिक्षा अपघातानंतर एसटी चालकास बेदम मारहाण, संबंधितावर गुन्हा दाखल
रिक्षा अपघातानंतर देवरूख येथे एसटी चालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी घडली. मारहाण करणार्या व्यक्तींवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा देवरूख आगारातील संतप्त चालक-वाहकांनी घेतला. त्यामुळे सकाळी ११ ते ३ या कालावधीत एकही बसफेरी सुटली नाही. अखेर मारहाणकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली.www.konkantoday.com