
खेड तालुक्यातील घाणेखुंटनजिक बेशुद्धावस्थेत आढळलेल्या कामगाराचा मृत्यू.
खेड तालुक्यातील घाणेखुंटनजिक असलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या पाठिमागे असलेल्या शोषखड्यात बेशुद्धावस्थेत आढळलेल्या ५३ वर्षीय कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोशन रामलेखावन लाल (रिव्हरसाईड) असे मृताचे नाव आहे.रोशन लाल हा कंत्राटी पद्धतीने ठेकेदार निरज सिंग यांच्याकडे हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीत काम करत होता.www.konkantoday.com