
पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांग व वयोश्री लाभार्थ्यांसाठी सोमवारी शिबिर
रत्नागिरी, दि. 21 :- सोमवार 24 फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, कुवारबाव येथे सकाळी 10 वाजता पंचायत समिती रत्नागिरी अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांग व वयोश्री लाभार्थ्यांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
याठिकाणी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एडीप व वयोश्री या भारत सरकारच्या योजनेंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागररिकांना मोफत साहित्य वाटपाकरिता तपासणी शिबिरांचे आयोजन केलेले आहे.000