
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या
मोफत ड्रायव्हिंग स्कूलमुळे ६५० युवकांना रोजगार
पालघर : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मौजे शिरसाड (जि. पालघर) स्थित उपपिठावर बेरोजगार युवकांसाठी पूर्णपणे मोफत मोटर ड्रायव्हिंग स्कूल सुरू आहे.
बेरोजगार युवकांना स्वयंपूर्ण बनवण्याच्या उदात्त हेतूने २०१४ पासून हे मोटार ड्रायव्हींग स्कूल नियमितपणे सुरू आहे.
दहा वर्षाच्या काळात ६५० पेक्षा अधिक युवकांनी ‘या मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. आता ते आपला स्वतःचा व्यवसाय करत आहेत.
पूर्णपणे विनामूल्य असलेल्या या मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये युवकांच्या भोजनाची तसेच निवासाची ही मोफत सोय संस्थानाच्या वतीने केली जाते. येथे उत्तम प्रशिक्षकांमार्फत हे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या युवकांना वाहन परवानादेखील संस्थानाकडूनच काढून दिला जातो.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने निरंतर कार्यरत असलेले हे विनामूल्य मोटार ड्रायव्हिंग स्कूलपालघर मधील आदिवासीबहुल भागातील बेरोजगार युवकांना स्वयंपूर्ण होण्यासाठी मोलाचे सहकार्य करत आहे.