शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी
छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी अखेर अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग सांगताना अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या दाव्यावरुन वादंग उठलेला आहे.आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटले, असं विधान राहुल सोलापूरकर यांनी केले होते. या वक्तव्यावरुन टीका झाल्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा नखभर सुद्धा अपमान करण्याचा माझा हेतू नाही, असं राहुल सोलापूरकर यांनी म्हटलं आहे.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे