![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2025/02/download-3-2.jpeg)
राजीवडा महिला मच्छिमार तालुका सहकारी संस्थेची मत्स्य व्यवसाय अधिकार्यांना मच्छिमार संस्थेची नोटीस
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आली. यामध्ये राजीवडा महिला मच्छिमार तालुका सहकारी संस्थेची बांधकामे सुद्धा जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईत संस्थेचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले असून ती भरपाई मागण्यासाठी संस्थेने मत्स्य व्यवसायाच्या अधिकार्यांना वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे.प्रादेशिक उपायुक्तांसह मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, प्रशिक्षण अधिकारी, परवाना अधिकारी यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मिरकरवाडा बंदर परिसरातील अतिक्रमण गेल्या २७ आणि २८ जानेवारी रोजी हटविण्यात आले.
या कारवाईत राजीवडा महिला मच्छिमार संस्थेची बांधकामे, स्वच्छतागृह, पाळणाघराचे बांधकाम पाडण्यात आली.यामधील इलेक्ट्रीक वस्तूंसह खिडक्या, लाद्या अशा अनेक वस्तूंचे १७ लाख २४ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर या कारवाईमुळे संस्थेची प्रतिमा मलीन झाली. त्याची भरपाई म्हणून ३ लाख रुपये अशी एकूण २० लाख रुपयांची भरपाई म्हणून मागणी करण्यात आली आहे.www.konkantoday.com