
माजी आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नोटीस बजावली
कोकणात शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नोटीस बजावली आहे.वैभव नाईक यांच्यासह त्यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक यांना रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडून नोटीस बजावण्यात आली आहे. याआधी ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांच्यामागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमीरा लागला आहे. तसेच राजन साळवी देखील ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात कोकणात ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याची सांगितले जात आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीसमध्ये वैभव नाईक आणि स्नेहा नाईक यांना चौकशीसाठी 11 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याआधी देखील वैभव नाईक यांची मालमत्ता प्रकरणी चौकशी झाली होती