
प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश.
रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडले असून तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये उपतालुकाप्रमुख अभय खेडेकर, महेंद्र झापडेकर आदींचा समावेश आहे.विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षसंघटन बळकट करण्याकडे शिवसेनेने लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यभरात ‘ऑपरेशन टायगर’ला राज्यभरात सुरुवात झाली आहे