
पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या नेतृत्त्वाखाली पाेलीस दल, चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले
पोलीस हे जनतेचे मित्र आहे ही प्रतिमा लोकांच्या मनात रत्नागिरी पोलीस रुजवत आहेत वेळ पडली तर श्रमदानासाठीही आम्ही हात पुढे करू, असा संदेश रत्नागिरी जिल्हा पाेलीस दलाने दिला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या नेतृत्त्वाखाली पाेलीस दल, चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले असून, पाेलीस अधीक्षक स्वत: तेथे ठाण मांडून आहेत.चिपळूण नगर परिषदेसह अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाल्याने मोठ्या मनुष्यबळाची गरज होती अशा प्रसंगी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी पुढाकार घेतला . स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस अंमलदार, पोलीस मित्र व पोलीस स्वयंसेवक कार्यरत आहेत. या सर्वांनी चिपळूण बाजारपेठेतील पूरप्रभावित भेंडीनाका परिसर, सोनार गल्ली परिसर, पानगल्ली परिसरातील दोन रस्त्यांवरील चिखल व साचलेला ढिगारा साफ करून नागरिकांना मदतकार्य केले.
www.konkantoday.com