कात उत्पादकांच्या समस्या निवारणासाठी लवकरच नवे धोरण आखले जाईल -ना. गणेश नाईक.
कात उत्पादकांच्या उद्योगात कोणत्याही प्रकारची समस्या राहणार नाही, यासाठी सर्वसमावेशक धोरण आखले जाईल, जेणेकरून पारंपारिक कात उत्पादक अडचणीत येणार नाहीत, याची ग्वाही महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी कोकणातील कात उत्पादकांबरोबर झालेल्या बैठकीत दिली.
मुंबईत वन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला मंत्री नितेश राणे, योगेश कदम यांच्यासह आ. दीपक केसरकर, शेखर निकम, भास्कर जाधव, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, वन खात्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या वेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कात उत्पादक संघटनेचे पदाधिकारी हजर होते.www.konkantoday.com