
रामदास कदमांची बदनामी झाली की आपल्याला शिवसेनेत स्थान मिळेल, अशा भ्रामक कल्पनेत काहीजण वावरत आहेत -आ. योगेश कदम यांची जोरदार टीका
आमदार रामदासभाई कदम आणि शिवसेनेमधील नाते कसे बिघडेल, त्यांची बदनामी झाली की मला शिवसेनेत स्थान मिळेल, अशा भ्रामक कल्पनेतील काहीजण वावरत आहेत. यासाठीच रामदासभाईंची बदनामी करण्यात काहीजण व्यस्त असल्याची टीका दापोलीचे आ. योगेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना केली. तसेच ज्या नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनी आपली पात्रता ओळखावी, अशी खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी खेडचे नगराध्यक्ष वैभव भेडेकर यांच्यावर केली. www.konkantoday.com