
खाजगी रूग्णालयांनी दर्शनी भागात दरपत्रक लावणे गरजेचे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने सर्व रूग्णालयांना अधिसूचना जारी करत सर्वांना दर्शनी भागात दरपत्रक लावणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही या रूग्णालयांनी ही अधिसूचना गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांच्या आत म्हणजेच फेब्रुवारीपूर्वीच दिलेल्या सूचनांची पूर्तता करावी, जर तपासणीत त्रूटी आढळून आल्यास त्या रूग्णालयांचे, दवाखान्याची नोंद रद्द करण्यात येईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले आहे.
शासनाच्या आरोग्य विभागाच्या कायद्यानुसार प्रत्येक खाजगी रूग्णालयात दर्शनी भागात दरपत्रक लावणे आवश्यक आहे. मात्र अनेक शहरातील तसेच ग्रामीण भागातील बहुतांश खासगी रूग्णालये व दवाखाने यांचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने याबाबत अधिसुचना जारी करत सर्व खासगी रूग्णालयांना दर्शनी भागात दरपत्रक लावणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. मात्र अद्यापही या रूग्णालयांनी ही अधिसूचना गांभीर्याने घेतलेली नाही.www.konkantoday.com