
बसणी येथील हातिसकर बंधूंनी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने आकर्षक पद्धतीने केली काेराेनाविषयीची जनजागृती
बसणी येथील हातिसकर बंधूंनी गणपती विसर्जनाच्या वेळी आपली आगळीवेगळी परंपरा राखली आहे दरवर्षी मिरवणुकीच्या वेळी दरवर्षी वेगळ्या विषयांवर जनजागृती केली जाते सर्व धर्म समभाव आदींचेही संदेश त्यांनी याआधी दिले होते गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची महामारी आली आहे या महामारीत डॉक्टर्स व नर्सेसनी मोलाचे योगदान दिले आहे त्यांना जनतेच्यावतीने सलाम करण्यासाठी हातिसकर बंधूंनी यावर्षीच्या गणेश विसर्जनाच्या निमित्ताने आगळा वेगळा संदेश दिला याशिवाय करोना महामार्गापासून दूर राहण्यासाठी जनतेने कोणती काळजी घ्यावी यासाठीचे देखील संदेश या मिरवणुकीद्वारे देण्यात आले मीच माझा रक्षक ही थीम घेऊन यामध्ये पीपी किट घातलेले डॉक्टर नर्सेस यांच्याबरोबरच मास्क घाला , सुरक्षित अंतर ठेवा आदी संदेशाचे फलक घेऊन महिलावर्गही सहभागी झाला होता
गणेश विसर्जनाच्या निमित्ताने हातिसकर बंधूंनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
www.konkantoday.com