केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली लागू झाल्याने आता निवृत्तीवेतन कोणत्याही बँकेतून काढू शकणार.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओने आपल्या सदस्यांना निवृत्तीवेतना घेण्यासाठी कोणत्याही बँकेतून रक्कम काढण्याची सुविधा दिली आहे. १ जानेवारी २०२५ पासून सीपीपीएस म्हणजे केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली लागू झाल्याने ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
राष्ट्रीय स्तरावर पेन्शन वितरणासाठी केंद्र सरकारने नवी प्रणाली लागू केली. ईपीएफओच्या ईपीएफ पेन्शन धारकांना या प्रणालीचा लाभ होणार आहे. या कर्मचार्यांना निवृत्तीनंतर मूळ गावी स्थलांतरीत व्हायचे असते त्यावेळी निवृत्तीवेतनाचे पैसे जवळच्या बँकेत मिळावेत अशी अपेक्षा गसते. आता कोणत्याही कटकटीशिवाय हे सदस्य गावातील बँकेतून निवृत्तीवेतनाची रक्कम काढू शकणार आहेत..www.konkantoday.com