
लाडक्या बहिणींना सातवा हप्ता मंत्रिमंडळ बैठकीनंतर -अदिती तटकरे.
लाडक्या बहिणींना सातवा हप्ता मंत्री मंडळाच्या बैठकीत तारीख ठरल्यानंतर दिला जाईल. डिसेंबरचा हप्ता महिन्याच्या अखेरीस खात्यात जमा झाला आहे. तसेच रायगड पालकमंत्री पदासाठी कोणताही तिढा नाही, जिल्ह्याच्या विकासासाठी काम करू, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. अदिती तटकरे म्हणाल्या आहेत.सोमवार दि. १३ जानेवारी रोजी मंत्री आदिती तटकरे या खेड दौर्यावर आल्या होत्या. पोयनार येथील शेवरोबा मंदिराच्या कार्यक्रमाला त्यांच्या आजोळी त्या आल्या होत्या, त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण या बाबत कसलाही तिढा नही, अजून कोणतेही पालकमंत्री झाले नाहीत. सगळे पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि शिवसेनेचे नेते ठरवतील, आम्ही प्रत्येकजण जिल्ह्याला पुढे नेण्याचे काम करू, असे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. राष्ट्रवादीचे युवा नेते अजय बिटवटकर यांची अपना सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मंत्री आदिती तटकरे, तसेच खेड तालुका -राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने सत्कार करण्यात आला. www.konkantoday.com